Saam Tv
प्रत्येकाच्या घरात उंदरांची समस्या असतेच. घरातील कपडे, धान्य, वायर अशा महत्वाच्या गोष्टी उंदीर चावून चावून वाट लावतात.
तुम्हीही उंदराला न मारता घरातून पळवून लावायचा विचार करत आहात? त्यासाठी सोपी ट्रिक्स तुम्हाला मदत करू शकते.
न मारता घरातून उंदराला पळवून लावण्यासाठी कांद्याचा वापर करू शकता.
तिखट लाल मिर्ची पावडर घरातील प्रत्येक कोपऱ्यात टाका, त्यामुळे उंदीर पळून जातील.
पेपरमिंटचा वासामुळे उंदीर त्रस्त होतो अन् पळ काढतो. उंदराला पळवण्यासाठी पेपरमिंटचा वापर करू शकता.
लवंगाचे तेलही उंदराला घरातून पळवण्यासाठी फायदेशीर ठरेल.
लसणाच्या पाकळ्या फोडून उंदीर फिरणाऱ्या जागेत टाका.. लसणाच्या वासाने घरातून उंदीर पळ काढतील.
सामान्य माहितीच्या आधारावर वरील माहिती देण्यात आली आहे. याची पडताळणी करण्यात आलेली नाही. फक्त माहिती म्हणून हा लेख देण्यात आलाय.