Sakshi Sunil Jadhav
भारतात राष्ट्रीय पक्षी, प्राणी कोण आहेत हे तुम्हाला माहितच असेल.
पुढे आपण भारतातील राष्ट्रीय पदार्थ कोणता हे जाणून घेणार आहोत.
मुळात भारताला अधिकृत असा कोणताही राष्ट्रीय पदार्थ नाही.
भारतीय राष्ट्रीय अन्न यांच्या माहितीनुसार 'खिचडी' हा राष्ट्रीय पदार्थ आहे.
खिचडी हा असा पदार्थ आहे जो सर्वसामान्यांपासून उच्च वर्गीयांपर्यंत सगळ्यांच्या घरी तयार केला जातो.
खिचडीसोबतच बिर्याणी, डोसा हे पदार्थ सुद्धा भारतात लोकप्रिय आहेत.
खिचडीला संस्कृतमध्ये 'खिच्चा' असे म्हणतात. त्यावरूनच खिचडी हा शब्द तयार झाला.
मुघल बादशहा अकबर यांच्या जेवणातला आवडीचा पदार्थ खिचडी होता.