Saam Tv
जगभरात आंब्याच्या हजारोहून अधिक जाती पिकवल्या जातात.
आंब्यांमध्ये फक्त हापूस आंबाच नाही तर काही असे आंबे आहेत जे खूप महाग विकले जातात.
द बेटर इंडियाने सर्वात महागडे असणाऱ्या आंब्यांची यादी काढली आहे.
त्यामध्ये जगभरात विकल्या जाणाऱ्या महागड्या आंब्यांची नावे आणि किमती दिल्या आहेत.
पाकिस्तानातील सिंध प्रदेशात सिंधूरी आंबा १ नग ३००० रुपयांना विकला जातो.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये कोहितूर आंबा ३ हजारांपासून विकला जातो.
अल्फोन्सो आंबा रत्नागिरी, देवगढ आणि कोकणात दीड हजारांपासून विकला जातो.
अफगाणिस्तानातून गुजरातमार्गे भारतात नुरजहां आंबे आणली जातात. याचे दर १००० रुपयांपर्यंत आहेत.
जपानमध्ये पिकवलेला हा आंबा जगातील सर्वात महागडा आंबा मानला जातो. हा आंबा ३ लाख रुपये किलोने विकला जातो.