Manasvi Choudhary
आई होण्याचा जितकं सुख वाटते तितकाच त्रास देखील महिलांना होतो.
गरोदरपणात महिलांना सकाळी मॉर्निंग सिकनेसचा त्रास मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
पहिल्या तीन महिन्यात महिलांना आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते.
महिलांच्या शरीरातील हार्मोन्स बदलांमुळे शरीरात उलट्या, मळमळ, मूड स्विंग्स, तणाव यासमस्या उद्भवतात.
थोड्या थोड्या वेळाने सतत खात रहा जेणेकरून पोट रिकामे असल्यास हा त्रास कमी होईल.
भाजलेले मखाना, सुका मेवा, फळे या हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा.
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो अशावेळी हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये या पदार्थाचे सेवन करा.
आल्याचा चहा प्यायल्याने मळमळपासून आराम मिळतो. यामध्ये लिंबू आणि मध केल्यास फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.