Manasvi Choudhary
मराठी भाषेत फार पूर्वीपासून आपल्याकडे म्हणी बोलल्या जातात.
मराठीतील अनेक म्हणीचे अर्थ हे वेगवेगळे असतात.
'आयत्या बिळात नागोबा' ही म्हण तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलीच असेल!
पण ही म्हण का बोलतात? याचा नेमका अर्थ काय? हे तुम्हाला माहितीये का?
'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ म्हणजे दुसऱ्यांच्या कामाचं यश मिळवणे असा होतो.
अर्थात कोणी तरी जीवापाड मेहनत घेऊन एखादी गोष्ट करतो आणि नंतर दुसरा त्यावर आपला हक्क गाजवतो.
दुसऱ्याने केलेल्या कष्टावर किंवा श्रमावर स्वतःचा स्वार्थ साधणे, किंवा दुसऱ्याच्या मेहनतीवर स्वतःचा फायदा उठवणे असा या म्हणीचा अर्थ आहे.