Manasvi Choudhary
हिवाळ्यात भेंडी खाणे खूप फायदेशीर आहे. भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट् असताता यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी, के, ए आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
व्हिटॅमिन केयुक्त भेंडी खाल्ल्याने हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हिवाळ्यात हाडेदुखीपासून आराम मिळतो.
भेंडी ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना फायदा होतो.
भेंडीमध्ये फायबर असल्याने ती पचायला सोपी असतात आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करतात.
गर्भवती महिलांनी भेंडीची भाजी आवर्जून खावी. भेंडी खाल्ल्याने गर्भवती महिलांना फायदा होतो.मॅग्नेशियम आणि फोलेट या भेंडीमधील पोषण तत्वांमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.