Car Tyre Numbers: कारच्या टायरवर लिहिलेल्या नंबरचा नेमका अर्थ काय असतो?

Surabhi Jayashree Jagdish

टायरवरील नंबर

कारच्या टायरवर लिहिलेले नंबर हे फक्त आकडे नसतात तर ते टायरची ओळख सांगतात. या नंबरमधून टायरचा आकार, त्याची क्षमता आणि वेगाची मर्यादा समजते. त्यामुळे टायरवरील नंबर समजून घेणे गाडी चालवणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे.

195/55 R16 87V Meaning | saam tv

कोडचा अर्थ

कारच्या टायरवर 195/55 R16 87V असा कोड लिहिलेला असू शकतो. या कोडमधील प्रत्येक नंबर आणि अक्षराचा वेगळा अर्थ असतो. या एका कोडमधून टायरची रुंदी, उंची, रिमचा आकार, वजन पेलण्याची क्षमता आणि वेगाची मर्यादा समजते.

Tyre Width Explained | saam tv

195 म्हणजे टायरची रुंदी

टायरवरील 195 हा नंबर त्याची रुंदी सांगतो. ही रुंदी मिलिमीटरमध्ये मोजली जाते. म्हणजेच या टायरची रुंदी 195 मिलिमीटर असते.

Tyre Sidewall Height | saam tv

उंचीचं प्रमाण

195/55 या कोडमधील 55 हा नंबर टायरच्या बाजूच्या भागाची उंची दर्शवतो. ही उंची टायरच्या रुंदीच्या 55 टक्के असते. म्हणजेच 195 मिलिमीटर रुंदी असलेल्या या टायरच्या बाजूच्या भागाची उंची सुमारे 107.25 मिलिमीटर असते.

R16 Tyre Meaning | saam tv

R म्हणजे रेडियल टायर

टायरवरील R या अक्षराचा अर्थ रेडियल कन्स्ट्रक्शन असा होतो. या प्रकारच्या टायरमध्ये आतील रचना रेडियल पद्धतीने केलेली असते. आधुनिक कारमध्ये अशा प्रकारचे टायर सर्वाधिक वापरले जातात.

Car Rim Size | saam tv

रिमचा आकार

टायरवरील R नंतर लिहिलेला 16 हा नंबर रिमचा आकार दर्शवतो. याचा अर्थ हा टायर 16 इंच आकाराच्या रिमवर बसवता येतो. त्यामुळे नवीन टायर घेताना गाडीच्या रिमचा आकार आणि टायरवरील हा नंबर जुळणं आवश्यक आहे.

Tyre Load Index | saam tv

वजन क्षमता आणि वेगाची मर्यादा

टायरवरील 87 हा नंबर त्याचा लोड इंडेक्स म्हणजेच वजन पेलण्याची क्षमता दर्शवतो. 87 लोड इंडेक्स असलेला एक टायर कमाल 545 किलोग्रॅम वजन पेलू शकतो. शेवटी लिहिलेले V हे स्पीड रेटिंग असून ते टायरची कमाल निर्धारित वेगमर्यादा ताशी 240 किलोमीटर असल्याचं सांगतात.

Tyre Markings Explained | saam tv

Car Engine Oil: किती किलोमीटर्सनंतर कारचं इंजिन ऑईल बदललं पाहिजे?

7000 km engine oil change | saam tv
येथे क्लिक करा