Sakshi Sunil Jadhav
हिमालयाच्या कुशीत लपलेला रंगीबेरंगी आणि सुंदर पक्षी म्हणजे मोनाल पक्षी. याचे दुसरे नाव हे Lophophorus impejanus आहे.
भारतात याला डांफी म्हणूनही ओळखलं जातं. त्याच्या जीवनशैलीपासून ते आवाजातील संकेतांपर्यंत अनेक गोष्टी गुपितं आणि गुढ आहे.
उत्तराखंड राज्याचा मोनाल हा राजकीय पक्षी आहे, तर Nepal मध्ये त्याला राष्ट्रीय पक्ष्याचा मान आहे.
भारत, नेपाळ, भूतान, म्यानमार, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील 2400 ते 4500 मीटर उंचीवरील बर्फाच्छादित पर्वत व दाट जंगलांत हा पक्षी आढळतो.
नर मोनालचे पंख निळे, हिरवे, लाल व पिवळ्या छटांनी नटलेले असतात. हा मोरा सारखा दिसतो. मादीचा रंग तपकिरी व साधा असतो.
जेव्हा या पक्षाला धोका जाणवतो तेव्हा साथीदारांना सतर्क करण्यासाठी, राग व्यक्त करण्यासाठी तसेच मादीला आकर्षित करण्यासाठी नर मोनाल पक्षी जोरात ओरडतो.
एप्रिल ते ऑगस्ट हा प्रजनन या पक्षाचा प्रजननाचा काळ असतो. नर नृत्य व पंख फुलवून मादीला आकर्षित करतो.
मादी जमिनीवर घरटं बांधून 3 ते 5 अंडी घालते. सुमारे 27 ते 30 दिवसांनी पिल्लाचा जन्माला येतं. पिल्ली 3 महिन्यांत अन्न शोधायला शिकतात.
मोनालची चोच अत्यंत मजबूत असते. तो झाडांच्या मुळांजवळ खोदून किडे, बिया व लहान जीव खातो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.