ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'ऑपरेशन सिंदूर' द्वारे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या ९ दहशतवादी अड्य्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला आणि देशाला कारवाईची माहिती दिली.
सोफिया यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील नौगाव येथील सरकारी जीटीसी प्राथमिक शाळेत झाले.
गुजरातची रहिवासी असलेल्या कर्नल सोफिया यांनी महाराजा सयाजीराव विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले.
कर्नल सोफिया लष्कराच्या कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजेच माहिती प्रणाली (सिग्नल कॉर्प्स) च्या प्रभारी आहेत.
कर्नल सोफिया यांची शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे भारतीय सैन्यात निवड झाली. कर्नल सोफिया २००६ मध्ये काँगोमध्ये तैनात होते. त्यांनी काँगोमध्ये UN Peace Keeping संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेअंतर्गत दोन वर्षे काम केले.
कर्नल सोफिया कुरेशी यांचे पती देखील लष्करी अधिकारी आहेत. त्यांचे आजोबा आणि काकाही सैन्याशी संबंधित होते.