ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
1 कप हिरवे मटार, पालक, 2 उकडलेले बटाटे, किसलेले आलं, गरम मसाला, आमचूर पावडर, बेसन, तेल आणि मीठ
सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून उकळवून घ्या. आणि बारीक चिरुन घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करा, त्यात पालक आणि उकडलेले मटार घाला आणि चांगले शिजवा.
आता शिजलेल्या भाज्या एका भांड्यात काढा आणि थंड होऊ द्या आणि त्यात उकडलेले बटाटे घाला आणि चांगले मॅश करा.
आता, यामध्ये मीठ, गरम मसाला, आमचूर पावडर, आणि हळद घालून घट्ट मिश्रण तयार करा.
पॅन गरम झाल्यावर यामध्ये थोडे तेल घाला. मिश्रणाला गोल किंवा तुमच्या आवडीच्या आकारामध्ये शेप करुन चांगले तळून घ्या.
हेल्दी आणि चटपटीत पालक- मटार कबाब तयार आहे. सॉस, दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.