Surabhi Jayashree Jagdish
पुलाव आणि बिर्याणी तयार करण्याच्या पद्धतीत खूप मोठा फरक असतो. पुलाव साध्या पद्धतीने शिजवला जातो, तर बिर्याणीला खास दम द्यावा लागतो. यामुळे दोन्ही पदार्थांची चव आणि सुगंध वेगळा लागतो.
बिर्याणी बनवताना अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. त्यामुळे बिर्याणीची चव अधिक मसालेदार आणि सुगंधी होते. पुलावामध्ये मात्र मसाल्याचे प्रमाण तुलनेने कमी ठेवले जाते.
बिर्याणी बनवताना तांदूळ आधी अर्धवट उकळून घेतले जातात. यानंतर त्या तांदळाचा वापर बिर्याणी तयार करण्यासाठी केला जातो. यामुळे बिर्याणीचे तांदूळ मोकळे आणि स्वादिष्ट लागतात.
पुलाव बनवताना तांदूळ मसाल्यांसोबत थेट पाण्यात शिजवले जातात. शिजताना तांदूळ पूर्ण पाणी शोषून घेतात. यामुळे पुलावाची चव एकसारखी आणि हलकी लागते.
बिर्याणी तयार करताना मसाले आणि तांदळाचे थर लावले जातात. सर्वप्रथम मसाला, त्यावर तांदूळ आणि पुन्हा मसाल्याचा थर दिला जातो. या पद्धतीमुळे बिर्याणीला खास चव आणि सुगंध मिळतो.
पुलाव बनवताना सर्व साहित्य एकाच वेळी भांड्यात टाकले जाते. तांदूळ, मसाले आणि भाज्या किंवा इतर पदार्थ एकत्र शिजवले जातात. म्हणून पुलाव बनवणे तुलनेने सोपे आणि जलद असते.
बिर्याणी अधिक मसालेदार, सुगंधी असते. पुलाव हलका, साधा आणि कमी मसालेदार लागतो. याच गोष्टी पुलाव आणि बिर्याणीला एकमेकांपासून वेगळे ठरवतात.