बिपी अचानक लो होण्यामागची कारणे काय?

Manasvi Choudhary

लो बिपी

अनेकदा आपल्याला किंवा आपल्या ओळखीच्या कोणाला अचानक अशक्तपणा जाणवतो, डोळ्यांसमोर अंधारी येते किंवा चक्कर येते. यामागचे कारण समजले तर ते असते बिपी लो.

Low Blood Pressure

लो बिपीची कारणे

मात्र तुम्हाला माहितीये का? अचानक बीपी लो का होतो. त्यामागची नेमकी कारणे काय आहेत ती या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Low Blood Pressure

लो बिपी त्रास

जेव्हा रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा खूप खाली जातो, तेव्हा शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपर्यंत रक्ताचा पुरवठा होत नाही तेव्हा लो बिपीचा त्रास उद्भवतो.

Low Blood Pressure | Yandex

शरीरात पाण्याची कमतरता

शरीरात पाण्याची कमी झाल्यास रक्ताचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे बीपी अचानक लो होऊ शकतो.

Dehydration

पोषणाचा अभाव

शरीराला व्हिटॅमिन्सची कमतरता, हिमोग्लोबीनची कमतरता याचा परिणाम रक्तदाबावर होतो.

Vitamin D | GOOGLE

ताणतणाव आणि थकवा

अतिरीक्त मानसिक ताण, चिंता किंवा सततच्या थकव्यामुळे शरीराचे नियंत्रण बिघडते आणि अचानक रक्तदाब कमी होतो.

Stress | pinterest

अचानक उठ किंवा बस केली तर...

बऱ्याच वेळ झोपून किंवा बसून राहिल्यानंतर जर एकदम झटक्यात उठले, तर गुरुत्वाकर्षणामुळे रक्त गोळा होऊन मेंदूपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे त्रास होतो.

Orthostatic Hypotension | Saam Tv

आरोग्याचे आजार

तुम्हाला जर हृदयाचे आजार, थायरॉईडची समस्या, मधुमेह चा त्रास असेल तर तुम्ही आरोग्याची काळजी घ्या.

Heart | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: Gen Z इतरांपेक्षा वेगळे का आहेत? जाणून घ्या कारणे

Gen Z
येथे क्लिक करा..