Manasvi Choudhary
पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलच निशाण्यावर धरलं आहे.
भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊलं उचलली आहेत.
सध्या दोन्ही देशात झालेली युद्धजन्य परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट जाहीर करण्यात आला आहे.
मात्र ब्लॅकआऊट म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.
युद्धजन्य परिस्थितीदरम्यान ब्लॅकआऊट प्रोटोकॉल अत्यंत महत्वाचा मानला जातो.
ब्लॉकआऊटचा मुख्य हेतू मुख्य ठिकाण हे शत्रूला मिळण्यापासून रोखणे हे आहे.
ब्लॅकआऊटमध्ये संपूर्ण परिसरात पूर्णत: अंधार होतो ज्यामध्ये कुठलाही जनरेटर किंवा इन्वर्टर लाईट देखील दिसत नाही.
युद्धातील स्मार्ट बॉम्ब किंवा स्मार्ट मिसाईल, अधुनिक हत्यारे यांना टार्गेट करणाऱ्या ड्रोनला प्रकाश आवश्यक असतो.
ब्लॉकआऊट केल्यास शंत्रूच्या दिशेने आलेला मिसाईल किंवा बॉम्ब टार्गेट पूर्ण करू शकत नाही.