Manasvi Choudhary
हिवाळ्यात व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे असते. मात्र थंड वातावरणामुळे सकाळी उठणे शक्य होत नाही. अनेकांना थंडीच्या दिवसात सकाळी उठायला कठीण होते. अशावेळी योगा करण्याची वेळ कोणती हे जाणून घ्या.
यानुसार हिवाळ्यात योगा करण्याची वेळ तुमच्या शारीरिक हालचालीवर आणि हवामानावर अवलंबून असते.
हिवाळ्यात योगा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. तसेच दुपारच्या वेळेत देखील तुम्ही हिवाळ्यात व्यायाम करू शकता.
हिवाळ्यात तुम्ही तुमच्या सोईनुसार देखील व्यायामाची वेळ निवडू शकता. सकाळी खूप थंडी असेल, तर थेट थंडीत व्यायाम करणे टाळावे. त्याऐवजी घरात किंवा इनडोअर व्यायाम करणे चांगले.
दुपारी व्यायाम केल्याने सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन डी मिळते आणि मूड चांगला राहतो.
हिवाळ्यात सुरुवातीला हलके व्यायाम करा आणि हळूहळू व्यायामाचा वेळ आणि तीव्रता वाढवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.