Manasvi Choudhary
दुपारी झोपणे किंव वामकुक्षी घेणे ही भारतीय संस्कृतीत जुनी परंपरा आहे. दुपारी थोडावेळ आराम करणं अनेकांची सवय असते.
मात्र तुम्हाला माहितीये का? दुपारी झोपण्याची देखील योग्य वेळ आहे तुम्ही चुकीच्या वेळी झोपल्यास आरोग्यावर परिणाम होतो.
दुपारी १ ते ३ या वेळेत झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
दुपारच्या जेवणानंतर शरीरातील रक्ताभिसरण पचनसंस्थेकडे वळते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या सुस्ती येते. ३ वाजेनंतर झोपल्यास रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.
३० मिनिटांपेक्षा जास्त झोपू नका. जर तुम्ही १-२ तास झोपलात, तर उठल्यानंतर तुम्हाला अधिक जडपणा आणि आळस जाणवेल
दुपारी झोपल्याने स्मरणशक्ती वाढते, ताण कमी होतो आणि कामात एकाग्रता वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.