Manasvi Choudhary
केस गळणे आणि केस तुटणे या समस्यांमुळे आजकाल अनेकजण त्रस्त आहेत, ज्याचा थेट परिणाम केसांच्या वाढीवर होतो. यामुळे केसांची वाढ खुंटते.
केसांच्या वाढीसाठी तुम्ही दररोजच्या जीवनशैलीत काही बदल करणे महत्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा आरोग्यावर नाही तर केसांवर देखील परिणाम होतो.
केस गळती रोखण्यासाठी आणि केसांच्यावाढीसाठी तुम्ही डाएटमध्ये काय खाल्ले पाहिजे. या विषयी या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
व्हिटॅमिन्स c ची मात्रा असलेले आवळा खाल्ल्याने केसांना मजबूती मिळते. केसांची मुळापासून वाढ होते.
काळे तीळ आयर्न आणि कॅल्शियमयुक्त असतात जे केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर असतात. केसांना मजबूत करतात.
सब्जा खाल्ल्याने केसांची नैसर्गिकरित्या वाढ होते. केसांना मऊ- मुलायम बनवण्यासाठी देखील फायदा होतो.
केसांच्या मजबुतीसाठी काळे चणे खाणे अत्यंत फायदेशीर आहे. काळ्या चण्यांमंध्ये प्रोटीन आणि झिंक असते यामुळे केसगळती थांबते.
नारळ पाणी प्यायल्याने केसांमधील कोरडेपणा कमी होतो. केस मऊ आणि मुलायम होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.