Manasvi Choudhary
केसांच्या वाढीसाठी केवळ तेल महत्वाचे नसून तुम्ही आहारात कोणकोणते पदार्थ खाता? हे देखील महत्वाचे आहे.
आजकाल प्रदूषण आणि बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आरोग्यासह केसांवर परिणाम होत आहे. केस तुटणे, केस गळणे, केसांची वाढ खुंटणे या समस्या होत आहेत.
लांब आणि मजबूत केसांसाठी तुम्ही आहार कसा घ्यावा? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
अंडी केसांसाठी फायदेशीर आहे. अंडी खाल्ल्याने प्रोटीन, व्हिटॅमिन ए, डी आणि बी 12 पोषकतत्वे शरीराला मिळतात यामुळे केसांना मजबूती मिळते.
शेंगदाणे खाल्लाने केसांची वाढ होते व केस मजबूत होतात. दररोज शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरेल.
सब्जा पाणी प्यायल्याने केसांना चमक येते. सब्जामध्ये अँटीऑक्सिड्टस, कॉपर आणि प्रोटीन हे गुणधर्म असतात यामुळे केसांना फायदा होतो.
फळांमध्ये किवी, द्राक्षे या फळांचा समावेश करा. या फळांमध्ये व्हिटॅमिन, आयरन आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने केसांची दुरूस्ती करतात.
केसांच्या मजबुतीसाठी स्काल्पची काळजी घेणे महत्वाचे आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हलक्या हाताने टाळूचा मसाज करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.