Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार, पर्समध्ये चांदीचे ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.
पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवल्याने धन, समृद्धी, आनंद आणि सकारात्मकता वाढते.
वास्तुशास्त्रानुसार, चांदीचे नाणे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाशी संबंधित मानले जाते. पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवल्याने संपत्तीत वाढ होते.
जर तुम्हालाही पैसे आल्याबरोबर खर्च करण्याची सवय असेल तुम्ही पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवा त्यामुळे बचत होईल.
पर्समध्ये देवी लक्ष्मी आणि गणपती याचे चित्र असलेले चांदीचे नाणे ठेवावे.
१) पर्समध्ये चांदीचे नाणे लाल कापडमध्ये गुंडाळून ठेवावे.
२) नाणे पर्समध्ये ठेवण्यापूर्वी शुक्रवारी ते गंगाजलाने शुद्ध करा. देवी लक्ष्मीसमोर ठेवून प्रार्थना करा आणि नंतर ठेवा.
३)पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवल्यानंतर पर्स नियमित स्वच्छ करा. पर्समध्ये जुन्या नोटा, कागदे ठेवू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.