Manasvi Choudhary
आषाढी एकादशी ही सर्वात महत्वाच्या एकादशीपैकी एक मानली जाते. येत्या २५ जुलैला सर्वत्र आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त अनेक महिला पूजेसाठी खास पारंपारिक, मराठमोळा लूक करतात. खणाची साडी हा महाराष्ट्रीयन प्रसिद्ध साडी प्रकार आहे.
तुम्हीदेखील आषाढी एकादशीनिमित्त नवीन साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खणाच्या साड्या निवडा.
या साडीचे कापड हे खणाचे असते त्यावर काठाची गोल्डन किंवा काळ्या रंगाची बॉर्डर असते त्यामुळे साडीचा लूक उठून दिसतो या साड्या खास तुम्ही कार्यक्रमात, सणासुदीला नेसू शकता.
जर तुम्हाला प्लेन साड्या आवडत असतील तर तुम्ही खणाच्या साड्या निवडा. या साड्या एकाच रंगाच्या असल्याने मराठमोळा लूक शोभून दिसतो.
खण आणि मऊ सिल्क या साड्यांचे मिश्रण असलेल्या खणाच्या साड्या तुम्ही निवडू शकता. या साड्यांमध्ये अनेक युनिक डिझाईन्स आणि रंग उपलब्ध आहेत. वजनालाही या साड्या हलक्या असल्याने नेसण्यासाठी कम्फर्टेबल आहेत.
खणाच्या साड्यांमध्ये साध्या डिझाईनसह चौकट डिझाईन्स असलेले साड्या ट्रेंडमध्ये आहेत. या साड्यांमध्ये मोठ्या किंवा लहान चौकटी असतात. यात दोन रंगांचे कॉम्बिनेशन वापरले जाते, जे दिसायला खूपच सुंदर असते.