ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा त्वचा जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहते तेव्हा सनबर्न होतो. यामुळे त्वचा गरम होऊन लाल, आणि वेदनादायी होते. हे सूर्याच्या यूवी किरणांमुळे होते. जे कधीकधी गंभीर असू शकते.
सनबर्नमुळे त्वचेवर जळजळ, वेदना आणि फोड येऊ शकतात. तसेच, त्वचेवर सुरकुत्या आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
त्वचेला उन्हापासून वाचवणे खूप महत्वाचे आहे. अशावेळी काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही यापासून आराम मिळवू शकता.
दर 2 तासांनी 30 किंवा त्याहून अधिक एसपीएफ असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा. पोहल्यानंतर किंवा घाम आल्यानंतर पुन्हा लावा.
सकाळी 10 वाजण्याच्या आधी आणि दुपारी 4 नंतरच बाहेर पडा. यावेळी यूवी किरणांचा प्रभाव कमी असतो.
त्वचेचा थेट सूर्यप्रकाश पडू नये म्हणून हलके पण पूर्ण बाह्यांचे कपडे, टोपी आणि सनग्लासेस घाला.
जेव्हा तुम्ही बाहेर असाल तेव्हा झाड, छत्री किंवा कोणत्याही सावलीचा वापर करा. विशेषतः दुपारच्या उन्हात या गोष्टींचा अवलंब करा.