ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्पर्म काऊंट म्हणजे एका मिलीलीटर वीर्यामध्ये किती शुक्राणू उपस्थित आहेत याचं मोजमाप होय. ही संख्या पुरुषांच्या प्रजनन आरोग्याचं मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते. स्पर्म काऊंटची अचूक माहिती सीमन अॅनालिसिस (Semen Analysis) या प्रयोगशाळेतील तपासणीतून मिळते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका मिलीलीटर वीर्यामध्ये किमान 15 दशलक्ष (15 million) स्पर्म्स असणं सामान्य मानलं जातं. तसंच एका संपूर्ण वीर्यस्खलनात (Ejaculate) एकूण 39 दशलक्ष किंवा त्याहून अधिक स्पर्म्स असणंही सामान्य आहे.

केवळ स्पर्म काऊंट पुरेसा नसतो. स्पर्मची हालचाल, रचना आणि वीर्याचं प्रमाण (Semen Volume) हे देखील तितकंच महत्त्वाचं असतात.
स्पर्मची निर्मिती पुरुषांच्या Testiclesमध्ये होते. ही प्रक्रिया शरीरातील हार्मोन्सच्या नियंत्रणाखाली सातत्याने सुरू असते. तयार झालेले स्पर्म पुढे प्रजनन प्रक्रियेसाठी सक्षम होतात.
गर्भधारणा होण्यासाठी शेवटी फक्त एक सक्षम स्पर्म स्त्रीच्या बीजांडापर्यंत पोहोचून त्याचं फलन करतो. मात्र त्या एका स्पर्मपर्यंत पोहोचण्यासाठी लाखो स्पर्मची उपस्थिती महत्त्वाची असते. त्यामुळे स्पर्म काऊंट आणि स्पर्मची गुणवत्ता या दोन्ही गोष्टी गर्भधारणेच्या दृष्टीने आवश्यक मानल्या जातात.
स्पर्म काऊंट कमी असल्याचं आढळल्यास युरोलॉजीस्ट किंवा Fertility Specialist यांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात. योग्य उपचार, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताण कमी ठेवणं यामुळे अनेक पुरुषांमध्ये स्पर्म काऊंटमध्ये सुधारणा होऊ शकते.