ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या होतात. यामध्ये हृदयविकाराची समस्या सर्वात जास्त आहे.
थकवा आणि अशक्तपणा हे हार्ट अटॅकचे सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे.
सायलेंट हार्ट अटॅक खूप धोकादायक असू शकतो कारण त्यात छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे इत्यादी सामान्य लक्षणे नसतात.
अतिशय जास्त अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे हे सायलेंट हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.
हार्ट अटॅकमध्ये अजून एक प्रकार म्हणजे, सायलेंट हार्ट अटॅक. सायसेंट हार्ट अटॅकला सायलेंट मायोकार्डियल इन्फार्शन असे म्हणतात.
सायलेंट हार्ट अटॅकमध्ये, सामान्य लक्षणे जाणवत नाहीत. ज्यामुळे व्यक्तीला कळत नाही की त्याला हार्ट अटॅक येत आहे.
हा हार्ट अटॅक विशेषतः कोरोनरी धमनी रोग, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह सारखे आजारांनी ग्रस्त लोकांसाठी जास्त धोकादायक असतो.