ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हनुमान जयंती चैत्र पोर्णिमेच्या दिवशी १२ एप्रिल रोजी आहे. या दिवशी बजरंगबलीची पूजा केली जाते.
हनुमान जयंतीला हनुमान चालीसाचे पठण करणे फायदेशीर मानले जाते.
परंतु तुम्हाला माहीत आहे का, हनुमान जयंतीला किती वेळा हनुमान चालीसाचे पठण करावे, जाणून घ्या.
मान्यतेनुसार, हनुमान जयंतीच्या दिवशी ७ वेळा हनुमान चालीसाचे पठण केल्याने विशेष लाभ होतो.
पठण केल्याने हनुमानजींचा आशिर्वाद मिळतो. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही पठण करु शकता.
हनुमान चालीसा पठण करण्यापूर्वी हनुमानजींसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा.
तुम्ही जास्तीत जास्त ११ वेळा किंवा १०८वेळा देखील हनुमान चालीसाचे पठण करु शकता. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच तुमच्यावरची संकटे दूर होतील.