Manasvi Choudhary
हिंदू धर्मात सणांना विशेष महत्व आहे.
जून महिन्यातला पहिला सण वटपौर्णिमा आहे.
पतीच्या उंदड आयुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमा हा सण महिला साजरा करतात.
या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करत व उपवास करतात.
विशेष म्हणजे पहिली वटपौर्णिमा नववधूसाठी खास असते. या दिवशी नटूनथटून पारंपारिक साजश्रृंगार करून महिला वडाची पूजा करतात.
उद्या १० जून २०२५ सर्वत्र वटपौर्णिमा वड पूजा मुहूर्त- सकाळी ८.५२ ते दुपारी २.०५ पर्यत साजरी होणार आहे.
वडाची पूजा करताना हिरव्या बांगड्या, गळसरी, पाच फळे ठेवावीत. नैवेद्याला गूळ- खोबरं व पंचामृत दाखवावे.
पूजा झाल्यावर स्त्रियांनी वडाला दोरा गुंडाळत सात फेऱ्या माराव्यात.