ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसून येतंय.
२०२० मध्ये आलेल्या कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता.
त्यावेळी सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला होता.
तुम्हीही कोरोनामध्ये याचा वापर केला असेल.
मग तुम्हाला सॅनिटायझरला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?
फार कमी लोकांना याचं उत्तर माहिती असू शकतं.
सॅनिटायझरला मराठीमध्ये शुद्धशुचिद्रव्य किंवा निर्जंतुकिकरण द्रव्य म्हणतो.