Siddhi Hande
अनेक तरुणांचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न असते.
यूपीएससी देऊन आयएएस होण्याची अनेकांची इच्छा असते. आयएएस झाल्यावर तुम्हाला अनेक पदांवर काम करायची संधी मिळते.
आयएएस झाल्यावर तुम्ही जिल्हाधिकारीदेखील होऊ शकतात.
आयएएस अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार ५६,१०० रुपये मूळ वेतन मिळते.
याचसोबत त्यांना टीए, डीए, एचआरए आणि इतर भत्ते मिळतात.
सुरुवातीला आयएएस अधिकाऱ्यांना दर महिन्याला १ लाख रुपये पगार मिळतो.
यानंतर पदोन्नती आणि पदासोबत पगारही वाढत जातो.
जेव्हा आयएएस अधिकारी कॅबिनेट सेक्रेटरी होतात तेव्हा त्यांना दर महिन्याला २.५ लाख रुपये पगार मिळतो.
साधारणपणे आयएएस अधिकाऱ्यांचे वेतन ५६,१०० ते २,२५,००० रुपये असते.