ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी AC चा वापर केला जातो. बहुतांश लोक रात्री एसी शिवाय झोपू शकत नाही.
रात्री झोपताना एसीचे तापमान योग्य असायला हवे, जेणेकरुन जास्त थंडीने तुमची झोप बिघडू नये तसेच लाइटचे बिल देखील बजेटमध्ये असावे.
अनेकांना हा प्रश्न पडतो की, रात्री झोपताना AC चे तापमान किती असावे, चला तर जाणून घेऊयात.
रिसर्चनुसार, गाढ झोपेसाठी १८ अंश सेल्सिअस तापमान सर्वोत्तम मानले जाते.
तुम्ही १६ ते १९ अंश सेल्सिअस दरम्यान एसीचे तापमान ठेवून गाढ झोपेचा आनंद घेऊ शकता.
माहितीनुसार, २३ अंश सेल्सियस तापमान झोपेसाठी उत्तम मानले जाते. कारण यामुळे अधिक थंडी लागत नाही.
थंड वातावरणामुळे झोपेमध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणून एसीचे तापमान योग्य असायला हवे.