ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. आंबा हा देशाचा राष्ट्रीय फळ देखील आहे.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन्स, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम, आणि अँटीऑक्सडंट्स सारखे अनेक पोषक तत्व असतात.
आंब्याला डोळे, हृदय, रोगप्रतिकारशक्ती आणि मेंदूसाठी फायदेशीर मानले जाते.
आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात, जाणून घ्या.
जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्याने गॅस, अतिसार आणि पोट दुखणे यासारखे पोटाचे विकार होऊ शकतात.
अतिप्रमाणात आंबा खाल्ल्याने दाताशी संबधित समस्या जसे की, कॅविटी होऊ शकते.
आंब्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. यामुळे वजन वाढू शकते.