ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महिला आपल्या हात, पाय, चेहरा आणि पाठीवरील नको असलेले केस काढण्यासाठी वॅक्सिंग करून घेतात. आता अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्स बाजारात उपलब्ध आहेत.
मध आणि फळांच्या वॅक्सव्यतिरिक्त, रिका वॅक्स आजकाल खूप लोकप्रिय होत आहे. सलूनमध्ये अनेकदा पहिला पर्याय म्हणून रिका वॅक्सचा ऑप्शन दिला जातो.
रिका वॅक्सला व्हाईट चॉकलेट वॅक्स असेही म्हणतात. हे व्हेजिटेबल तेल आणि वनस्पती-आधारित घटकांपासून बनवले जाते.
हा वॅक्स सर्वप्रथम रिका कंपनी नावाच्या एका इटालियन कॉसमॅटिक कंपनीने तयार केला होता. म्हणूनच त्याला रिका वॅक्स हे नाव मिळाले.
रिका वॅक्सिंगमुळे त्वचे संबंधित अनेक फायदे होतात. सामान्य आणि रिका वॅक्सिंगमध्ये काही महत्त्वपूर्ण फरक देखील आहेत. तर जाणून घ्या रिका वॅक्स नक्की काय काम करते.
अपर लिप्स किंवा बिकिनी वॅक्सिंगसाठी रिका वॅक्स वापरू शकता. सामान्य वॅक्सच्या तुलनेत रिका वॅक्समुळे कमी वेदना होतात.
जर तुमच्या त्वचेवर टॅनिंग असेल, तर रिका वॅक्स टॅनिंग पूर्णपणे स्वच्छ करते. यामध्ये वापरले जाणारे चॉकलेट टॅन रिमूव्हर मानले जाते.
अनेक लोकांच्या हातांवर आणि पायांवर लहान केस असतात जे पूर्णपणे वाढत नाहीत. रिका वॅक्सने हे केस देखील सहजपणे काढता येतात.
सामान्य वॅक्सिंगनंतर त्वचा थोडी सैल दिसते, परंतु रिकाने वॅक्सिंग केल्यावर त्वचा घट्ट राहते.
रिका वॅक्स सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य मानले जाते . हे सेंसेटिव्ह, ऑयली आणि ड्राय या सगळया प्रकारच्या त्वचेसाठी रिका वॅक्स उत्तम आहे.