Warm Water Bath: रात्री कोमट पाण्याने आंघोळ केल्याने 'या' समस्या होतील दूर

Shruti Vilas Kadam

ताणतणाव आणि मानसिक थकवा कमी होतो


दिवसभराच्या कामानंतर कोमट पाण्याने आंघोळ केल्याने स्नायू सैल होतात आणि मन शांत होते. त्यामुळे ताणतणाव दूर होण्यास मदत मिळते.

Warm Water Bath

झोप न लागण्याची समस्या दूर होते


कोमट पाणी शरीराचे तापमान संतुलित ठेवते. त्यामुळे शरीर रिलॅक्स होऊन झोप लवकर लागते आणि अनिद्रेचा त्रास कमी होतो.

Warm Water Bath

स्नायू व सांधेदुखी कमी होते


कोमट पाण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे स्नायू आखडणे, पाठदुखी व सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

Warm Water Bath

सर्दी-खोकला व नाक बंद होणे कमी होते


रात्री कोमट पाण्याने आंघोळ केल्याने वाफेचा परिणाम होतो. त्यामुळे नाक मोकळे होते आणि कफ सैल होऊन सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो.

Warm Water Bath

त्वचेचा कोरडेपणा कमी होतो


थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि खाज-जळजळ कमी होते.

Warm Water Bath

रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते


कोमट पाण्याने आंघोळ केल्याने रक्तवाहिन्या सैल होतात. त्यामुळे उच्च रक्तदाबामुळे येणारी अस्वस्थता काही प्रमाणात कमी होऊ शकते.

Warm Water Bath

थकवा आणि अंगदुखी दूर होते


दिवसभराचा शारीरिक थकवा कोमट पाण्याने आंघोळ केल्याने पटकन उतरतो आणि शरीराला ताजेतवानेपणा मिळतो.

Warm Water Bath

सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने 'हे' आजार होतात दूर

Warm water | yandex
येथे क्लिक करा