Shruti Vilas Kadam
सकाळी कोमट पाणी पिल्याने पचनसंस्था सक्रिय होते. त्यामुळे मलावरोधाची समस्या कमी होऊन पोट साफ राहते.
कोमट पाणी पोटातील आम्लता संतुलित ठेवते. यामुळे गॅस, छातीत जळजळ व अपचनाच्या तक्रारी दूर राहतात.
हे पाणी मेटाबॉलिझम वाढवते आणि शरीरातील साठलेली चरबी वितळण्यास मदत करते. त्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो.
कोमट पाणी घसा स्वच्छ ठेवते आणि कफ कमी करते. त्यामुळे सर्दी, खोकला व घसा दुखणे यावर फायदा होतो.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत झाल्याने त्वचा स्वच्छ व चमकदार राहते. पिंपल्स व मुरुमांची समस्या कमी होते.
कोमट पाणी नियमित पिल्याने लघवी साफ होते. त्यामुळे युरिन इन्फेक्शन व किडनीशी संबंधित त्रास कमी होतो.
शरीरातील रक्ताभिसरण सुधारल्याने सांधेदुखी व स्नायू आखडण्याचा त्रास कमी होतो.