Saam Tv
सध्या छावा चित्रपटामध्ये गाजलेल्या रश्मिका मंदानाची चर्चा सर्वत्र पसरत आहे.
रश्मिकाने या चित्रपटात महाराणी येसुबाईंची भुमिका साकारली आहे.
रश्मिका दिसायला सुंदर आणि फिटनेस जपणारी आहे. अशीच काही गुपिते आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.
रश्मिका नेहमीच तिच्या खाण्याकडे लक्ष देते. त्यामुळेच आपली स्कीन सुंदर आणि आकर्षित होत असते.
रश्मिका रोज सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी पिते. त्याने त्वचा सहज चमकदार बनते.
दिवसातून नियमित दोनदा तरी सौम्य क्लिंजरने चेहरा स्वच्छ करावा. त्याने चेहरा ऑयली दिसत नाही.
घराच्या बाहेर पडण्या अगोदर रश्मिका व्हिटॅमिन सी सिरमचा वापर नियमित करते.
तसेच रश्मिका चेहरा स्वच्छ केल्यावर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचा वापर करते.