Rabies Symptoms: रेबीज म्हणजे काय आणि तो का होतो? सुरुवातीची लक्षणे कोणती?

Dhanshri Shintre

रेबीज

रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित कुत्रा, मांजर, माकड यांच्या चाव्यामुळे होतो आणि मज्जासंस्थेवर परिणाम करत प्राणघातक ठरतो.

कशामुळे होतो?

संक्रमित प्राण्याच्या चाव्याने, चाटण्याने किंवा ओरखड्याने लाळेतून रेबीज विषाणू शरीरात प्रवेश करतो आणि गंभीर आजार होऊ शकतो.

सुरुवातीची लक्षणे

प्राण्याच्या चाव्याच्या जागी जळजळ, मुंग्या किंवा खाज येणे ही रेबीजची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

ताप, अशक्तपणा

शरीरात ताप, अशक्तपणा व थकवा जाणवतो, जी लक्षणे सामान्य वाटली तरी रेबीजमध्ये ती लवकर आणि तीव्रपणे वाढतात.

घसा कोरडा होणे

रेबीजचे लक्षण म्हणजे घसा कोरडा होणे आणि पाणी पाहून घाबरणे, कारण घशातील स्नायू आकुंचनामुळे पाणी प्यायण्यात त्रास होतो.

वेदना

रेबीजमुळे शरीरात वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना सुरू होऊन अर्धांगवायू होऊ शकतो, तसेच श्वसन व हृदयावरही याचा गंभीर परिणाम होतो.

विचित्र वागणूक

रेबीजमध्ये चिडचिड, गोंधळ, राग व मानसिक असंतुलन दिसून येते, काही वेळा व्यक्ती विचित्र वागणूक दाखवते किंवा हिंसक होऊ शकते.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NEXT: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

येथे क्लिक करा