Dhanshri Shintre
पावसाळा हिरवळीचा आणि आनंदाचा असला तरी, हा काळ संसर्गजन्य आजारांसाठी जोखीम वाढवतो.
पावसाळ्यात डोळ्यांमध्ये लालसरपणा, खाज, एलर्जी आणि स्त्रावासह डोळे येण्याच्या समस्या वाढतात.
डोळे हाताळण्यापूर्वी हात स्वच्छ करण्यासाठी साबण आणि पाण्याने नीट धुवा.
स्वच्छ न झालेल्या हातांनी डोळ्यांना हात लावण्याचे टाळावे, कारण त्यामुळे संसर्ग होऊ शकतो.
टॉवेल्स, मेकअप ब्रश, कापसाचा वापर इतरांशी शेअर करू नका, कारण त्यामुळे डोळ्यांमध्ये बॅक्टेरिया पसरू शकतात.
पावसाच्या पाण्यामुळे डोळ्यांमध्ये मळकटपणा, जीवाणूंचा धोका वाढतो, त्यामुळे स्वच्छ पाण्याने डोळे धुणे आवश्यक आहे.
डोळे लालसर, दुखणारे किंवा स्त्राव होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे भेट देऊन योग्य उपचार घ्या.
पावसाळ्यात लेन्स वापरताना अधिक सतर्क रहा. पावसाच्या पाण्याने डोळे भिजल्यास लगेच लेन्स काढा आणि सोल्युशनेने स्वच्छ करा.
पावसाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे आणि संतुलित, पोषक आहार घेणे आवश्यक आहे, जेणेकरून डोळे आणि शरीर निरोगी राहतील.