ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
परदेशात देखील भारतीय प्रोडक्ट सहज उपलब्ध होतात. नुकताच, अमेरिकेतील डलास वॉलमार्ट एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये भारतीय वस्तू आणि त्यांची किंमत सांगण्यात आली आहे, जी भारतीय मार्केटपेक्षा जास्त आहे.
वॉलमार्टमध्ये भारतीय खाद्यपदार्थ जसे की, मसूर डाळ, मूग डाळ, आलू भुजिया, गुड डे, हाइड अँड सीक बिस्किट्स, बिरयानी मसाला, बटर चिकन सॉस आणि पारले जी देखील मिळतो.
भारतात पारले जी बिस्कीट हा ५ ते २० रुपययांपर्यंत मिळतो, पण तेच बिस्कीट अमेरिकेत किती रुपयांना मिळतो, जाणून घ्या.
भारतात जे पारले बिस्कीट २० रुपयांना मिळतो. तेच अमेरिकेत, पारले जी आणि हाईड अँड सीक ४.५ डॉलर्स म्हणजेच ३७० रुपयांना मिळतो.
मसूर डाळ आणि मूग डाळ ही ४ डॉलर्सला म्हणजेच ३३० रुपयांना मिळत आहे.
परदेशात भारतीय वस्तू महाग मिळणे ही सामान्य बाब आहे. कस्टम ड्युटी आणि शिपिंग चार्जेसमुळे या वस्तूंची किंमत वाढते.