ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गेल्या आठवड्यात, गूगलने एक गुगल फोन अॅपसाठी नवीन अपडेट जारी केले, त्यानंतर लोकांची कॉलिंग स्क्रीन बदलली.
गुगलच्या या अपडेटनंतर सोशल मीडियवर अनेकांनी तक्रारी केल्या तर दुसरीकडे मीम्सचा पाऊस पडला. लोकांच्या मते, गुगलने च्यांना नकळत हा अपडेट जारी केला.
कंपन्या कोणतही अॅप अपडेट करण्यापूर्वी लोकांना माहिती देते किंवा कळवते, परंतु कधीकधी बॅकग्राउंड अपडेट्स देखील जारी केले जातात.
स्क्रीनमधील बदलामुळे, लोकांना पुन्हा कॉल रिसिव्ह करण्याची पद्धत समजून घ्यावी लागेल. जर तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही जुनी कॉलिंग स्क्रीन परत आणू शकता. पण ते कसं, जाणून घ्या.
सर्वप्रथम तुम्हाला फोन अॅपवर लॉंग प्रेस करावे लागेल. तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या अॅप इन्फोवर क्लिक करा. सेटिंग्ज > अॅप्स > फोन वर जाऊन तुम्हाला याचा अॅक्सेस मिळेल. येथे तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉटवर क्लिक करा.
येथे तुम्हाला अपडेट्स अनइंस्टॉल करण्याचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला एक मेसेज दिसेल.
यानंतर, तुम्हाला फोन अॅपची फॅक्टरी वर्जन मिळेल, यामध्ये तुमची कॉलिंग हिस्ट्री डिलीट होईल. यामध्ये तुमचे कॉनटॅक्ट्स डिलीट होणार नाहीत.