ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करतात. यावेळी आपल्या रेल्वे तिकिटांवर छापलेल्या विविध तपशीलाचे काही तरी महत्व असते.
जर तुम्ही कधी भारतात रेल्वे तिकीट बुक केले असेल, तर तुम्हाला नक्कीच १०-अंकी पीएनआर क्रमांक तिकिटावर दिसला असेल.
पीएनआरचा फुलफॉर्म Passenger Name Record म्हणजेच "प्रवासी नाव रेकॉर्ड"
पीएनआर हा रेल्वे तिकीट बुक करताना तयार होणारा युनिक आयडेन्टिफिकेशन नंबर आहे. या क्रमांकावर प्रवाशाच्या प्रवासासी संबंधित महत्त्वाचे तपशील असतात.
पीएनआर हा सेंटर फॉर रेलवे इन्फॉर्मेशन सिस्टम्सच्या केंद्रीय डेटाबेसमध्ये सेव्ह केला जातो. यामध्ये प्रवाशाचे नाव, लिंग, वय, ट्रेन नंबर, प्रवासाची तारीख, बोर्डिंग पॉइंट, डेस्टिनेशन, कोच आणि सीट नंबर, तिकिट दर आणि बुकिंग या गोष्टींची माहिती असते.
पीएनआरचा उपयोग तुमच्या तिकिटाची स्थिती तपासण्यासाठी केला जातो. जसे की, तिकिट कन्फर्म आहे की वेटिंगलिस्टमध्ये आहे. प्रवासी आयआरसीटीसी वेबसाइटवर रिअल-टाइम अपडेट्स मिळविण्यासाठी त्यांच्या पीएनआर नंबर वापरु शकतात.
पीएनआरचे पहिले तीन अंक हे रेल्वेच्या, जिथे तिकीट बुक केले गेले आहे, त्या झोनला दर्शवतात. तर उर्वरित सात अंक हे युनिक आयडेन्टिफिकेशन नंबर असतात.
जर तुम्ही पुढच्या वेळी रेल्वेने प्रवास करत असाल, तर या १० अंकी पीएनर नंबरकडे दुर्लक्ष करु नका.