ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रोजच्या नाश्त्याला काही तरी हेल्दी आणि टेस्टी बनवायचं असेल तर हे रव्याचे अप्पे नक्की ट्राय करा.
रवा, कांदा, हिरवी मिरची, आलं, ताक, जिरे, बेकिंग सोडा, तेल आणि मीठ
एका भांड्यात रवा घ्या, त्यात ताक घाला आणि मिश्रण तयार करा. मिश्रण जास्त जाड किंवा पातळ करू नका.
आता या मिश्रणात कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबिर घाला. तसेच जिरे, मीठ, बेकिंग सोडा देखील घाला. आणि व्यवस्थित मिक्स करा.
अप्पे बनवण्याच्या भांड्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर, रव्याचे मिश्रण ओता आणि साचा पूर्ण भरा. झाकण लावून मध्यम आचेवर शिजवा.
अप्पे हलके ब्राऊन होईपर्यंत चांगले वाफवून घ्या. तुमचे अप्पे ५-७मिनिटांत तयार होईल.
मऊ आणि टेस्टी रव्याचे अप्पे तयार आहे. नारळाची चटणी किंवा सांबार सोबत याचा आस्वाद घ्या.