ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चुकीच्या जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे किडनीशी संबंधित समस्या वाढत आहेत.
आज आम्ही तुम्हाला किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी खाऊ शकता, हे सांगणार आहोत.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आहारात बीटचा समावेश केला पाहिजे.
लसूण खाल्ल्याने किडनी हेल्दी राहण्यास मदत होते
सफरचंद हे औषधी गुणधर्माने भरपूर फळ आहे. याचा आहारात समावेश केल्याने किडनी निरोगी राहण्यास मदत होते.
दररोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. यामुळे किडनीला होणारे नुकसान कमी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.