ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्ट्रॉबेरी आणि केळी या दोन्हीही फळांमधील पोषक तत्व आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
१ पिकलेली केळी, १/२ कप स्ट्रॉबेरी, १/२ कप अननसाचे तुकडे, १/२ कप दही, १ कप विना साखरेचे बदामाचे दूध किंवा कोणतेही दूध, १ चमचा मध किंवा मॅपल सिरप आणि काही बर्फाचे तुकडे
केळी, स्ट्रॉबेरी, अननस आणि दही मिक्सर किंवा ब्लेंडरमध्ये घाला. आणि बारीक करा.
नंतर यामध्ये बदामाचे दूध किंवा इतर कोणतेही दूध आणि बारीक करा.
आता, यामध्ये तुमच्या चवीनुसार, मध किंवा मॅपल आणि बर्फ घाला.
स्मूदी घट्ट आणि क्रिमी होईपर्यंत मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये बारीक करा.
तुमची स्ट्रॉबेरी - केळी स्मूदी तयार आहे. एका ग्लासमध्ये ही स्मूदी काढून घ्या. यामध्ये केळी आणि स्ट्रॉबेरीचे बारीक काप आणि ड्राय फ्रुट्स घालून थंड स्मूदीचा आस्वाद घ्या.