ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आंब्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयरन ,फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स, अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक तत्व आणि नैसर्गिक साखर असते.
आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढू शकते. परंतु याशिवाय आंबा खाल्ल्याने कोणते फायदे होतात, जाणून घ्या.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे दृष्टी सुधारण्यास मदत करते.
आंब्यामध्ये फायबर असतात, जे अन्न पचवण्यास मदत करतात. आंबा खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या दूर होतात.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
आंब्यात व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन असल्याने ते त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि उजळवते. तसेच, केसांची मुळे मजबूत करते आणि केस गळती थांबवते.
आंब्यामध्ये आयरनचे प्रमाण जास्त असते. हे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात.