ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. हा एक हार्मोनल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये महिलांच्या अंडाशयात गाठी किंवा तयार होऊ लागतात. आणि याचा परिणाम महिलांच्या संपूर्ण आरोग्यावर होतो.
पीसीओडी होण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये अनहेल्दी खाण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली, हार्मोनल बदल, लठ्ठपणा, जास्त ताण याचा समावेश आहे.
जेव्हा पीसीओडी होतो तेव्हा शरीरात अनेक बदल आणि लक्षणे दिसून येतात, याकडे दुर्लक्ष करु नका.
पीसीओडीमध्ये मासिक पाळी उशिरा येते किंवा कधीकधी महिने येत नाही. काही प्रकरणांमध्ये, मासिक पाळी खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाणात देखील येऊ शकते.
हार्मोनल असंतुलनामुळे, शरीरातील मेटबॉलिजम रेट मंदावते. ज्यामुळे वजन वाढू शकते. विशेषतः पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होते.
पीसीओडीमध्ये, अँड्रोजन हार्मोनच्या वाढत्या पातळीमुळे चेहरा, हनुवटी, छाती आणि पाठीवर जास्त केस वाढू शकतात. याशिवाय, त्वचा तेलकट होते आणि मुरुमे वारंवार दिसू लागतात.
पीसीओडीमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे महिलांना अनेकदा मूड स्विंग, चिडचिड, चिंता किंवा नैराश्याचा अनुभव येऊ शकतो. यासोबतच, जास्त काम न करताही थकवा जाणवतो.