ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिव्हर हा आपल्या शरीरातला महत्वाचा अवयव आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून रक्त स्वच्छ करते. तसेच पचनासाठी देखील मदत करते.
शरीरात काही आवश्यक व्हिटॅमिन्सच्या कमतरतेचा परिणाम लिव्हरवर होतो. हे व्हिटॅमिन्स कोणते, जाणून घ्या.
व्हिटॅमिन ए लिव्हरमधील पेशींना निरोगी ठेवण्याचे काम करतात. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे लिव्हरची सेल्फ रिपेयरिंग क्षमता कमी होते. सूज येण्याची शक्यता वाढते.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे फक्त हाडांवरच परिणाम होत नाही, तर लिव्हरची फॅट मेटाबॉलिजम रेट देखील कमकुवत करते. यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो.
व्हिटॅमिन ई हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहे. याच्या कमतरतेमुळे लिव्हरच्या पेशींचे नुकसान होऊ शकते. आणि फॅटी लिव्हरची समस्या वाढू शकते.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे लिव्हरला सूज येणे तसेच पचनाशी संबधित समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते.
व्हिटॅमिन बी ६च्या कमतरतेमुळे लिव्हरची डिटॉक्स करण्याची क्षमता कमकुवत होते.