ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाखो लोक पेमेंट करण्यासाठी UPI चा वापतात. एका चहाच्या टपरीवर चहा प्यायचा असो की, ऑनलाईन शॉपिंग प्रत्येक गोष्टींसाठी यूपीआय पेमेंट सिस्टम वापरले जाते.
डिजिटल पेमेंट आल्यापासून घोटाळे आणि फसवणूकीचे प्रकरण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्ही ऑनलाईन फसवणूक टाळू शकता.
तुमचा यूपीआय पिन कोणासोबतही शेअर करु नका. यामुळे तुम्ही यूपीआय फसवणूक टाळू शकता.
जर तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबरवरुन कोणतीही लिंक पाठवण्यात आली असेल तर त्यावर क्लिक करु नका.
यूपीआय अॅप नेहमी अधिकृत स्टोअरमधूनच डाउनलोड करा. कोणत्याही लिंकवरुन अॅप डाउनलोड करु नका.
ओटीपी म्हणजेच वन टाइन पासवर्ड कोणासोबतही शेअर करु नका. अनेकवेळा स्कॅमर फसवे कॉल करुन ओटीपी मागतात.