ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीराला डिटॉक्स करण्यासाठी तसेच दिवसभर उर्जेसाठी तुम्ही या हेल्दी ज्यूसचे सेवन करु शकता.
शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडी फायदेशीर आहे. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.
पालकमध्ये आयरन आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
दुधीच्या ज्यूसचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच यामुळे पचनसंस्था सुधारते.
आवळा हे व्हिटॅमिन सीने समृद्ध असते. याचे ज्यूस प्यायल्याने त्वचेशी संबधित समस्या कमी होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध किवी डोळ्यांच्या दृष्टीसाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.
सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या दरम्यान ज्यूस पिणे फायदेशीर मानले जाते.