ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पॅनिक अटॅक ही मानसिक आरोग्याशी संबधित एक स्थिती आहे, ज्यामध्ये अचानक भीती वाटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे दिसून येतात.
पॅनिक अटॅक येण्याआधी कोणत्याही कारणाशिवाय हृदयाचे ठोके वाढू लागतात.
दैनंदिन जीवनातील तणाव किंवा कुटुंबाचा दबाव हे पॅनिक अटॅक येण्यामागील मुख्य कारण आहे.
जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्याने देखील पॅनीक अटॅक येऊ शकतात.
ज्या लोकांना एंग्झायटी डिसऑर्डर आहे त्यांना पॅनिक अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक असतो.
पॅनिक अटॅक अचानक येऊ शकतात परंतु त्यामागे दीर्घकालीन मानसिक अस्थिरता असू शकते.
पॅनिक अटॅक आल्यानंतर ही स्थिती २० मिनिटांपर्यत अशीच राहू शकते. परंतु याचा परिणाम शरीरावर तासनतास राहू शकतो.