Shruti Vilas Kadam
हा असा लुक आहे ज्यात जास्त मेकअप न करता सौम्य आणि नॅचरल दिसण्याचा प्रयत्न केला जातो.
हलकी आणि सटल ज्वेलरी जसे की बारीक चेन, छोटे स्टड, एक अंगठी किंवा नाजूक ब्रेसलेट वापरली जाते.
ऑफिस, डेटवर किंवा फेस्टिव्हलमध्ये सर्व ठिकाणी मिनिमलिस्ट ज्वेलरी योग्य ठरते.
चेहरा नॅचरल दिसण्यावर भर द्या हेवी फाउंडेशन किंवा कंटूरच्या ऐवजी हलका बेस, न्यूड लिपस्टिक, सटल ब्लश आणि मस्कारा वापरणे.
टिंटेड मॉइश्चरायझर किंवा बीबी क्रीम, हलका ब्लश, हायलाइटर, मस्कारा आणि न्यूड/पिच रंगाची लिपस्टिक तुम्हाला मिनिमलिस्ट लूक देतात.
बदलत्या फॅशन व सौंदर्य जगात भव्यतेपेक्षा सादगी म्हणजेच साधा पण अट्रॅक्टिव्ह लूक जास्त पसंत केला जातो.
कमी वेळ, सहजता, कमी खर्च व नॅचरल दिसण्यासाठी हा लुक उपयुक्त ठरतो. तसेच ओव्हर-डन होण्यापासून हा लूक वाचवतो.