Saam Tv
मेथी ही प्रत्येकाच्या घरात खाल्ली जाणारी भाजी आहे.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आठवड्यातून एकदा तरी मेथीची भाजी खाल्ली जाते.
मेथीच्या भाजीसोबत मेथीचे दाणे सुद्धा खूप फायदेशीर असतात.
मेथीचे दाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.
अशा रोजच्या आहारातल्या मेथीला इंग्रजीत काय म्हणतात? हे अनेकांना माहित नसते.
तर हिरव्या गार मेथीला इंग्रजीत 'फेनुग्रीक' असे म्हणतात.
मेथीचा वापर जागतिक स्तरावर स्वयंपाकात आणि औषधांमध्ये केला जातो.
मेथी ही चवीला कडवट अशी असते. तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात.