Saam Tv
बऱ्याच वेळेस घरी केलेले डोसे खूप जाड आणि नरम होतात.
अशा वेळेस तुम्ही वेगळ्या पद्धतीने अगदी कमी वेळात उत्तम आणि चविष्ट डोसा तयार करू शकतो. चला जाणून घेवू रेसिपी.
रवा, पोहे, जिरे, हिरवी मिरची, दही, पाणी, बेकिंग सोडा इत्यादी.
सर्वप्रथम मिक्सर जारमध्ये भिजवलेला रवा, पोहे, मिरची, जिरे आणि दही एकत्र करून पाणी न घालता पेस्ट तयार करून घ्या.
हे संपुर्ण बारीक केलेले पीठ एका भांड्यात काढा. पीठ शक्यतो लगेच पसरेल असे ठेवा.
आता यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट/बेकिंग सोडा घाला आणि चांगले मिसळून घ्या.
आता तवा गरम करा. डोसा बनवण्यासाठी तवा तेलाने हलका ग्रीस करून आणि टिश्यूने पुसून तयार करा.
तव्यावर काही थेंब पाणी शिंपडा हे आवश्यक आहे. त्याने डोसा क्रिस्पी होईल.
आता एक पळी डोशाचे पीठ घेऊन ते गोल पसरवा. गॅस मध्यम आचेवर असूद्या.
डोसाची दुसरी बाजू उलटा डोसा व्यवस्थित शिजवून गरमा गरम डोसा नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.