ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महिलांप्रमाणेच पुरुषांनाही मासिक पाळीच्या समस्या होऊ शकतात.
यामध्ये फरक एवढाच आहे की , पुरुषांना स्त्रियांप्रमाणे रक्तस्त्राव होत नाही, ज्याला वैद्यकीय भाषेत मेन्सट्रुअल ब्लीडिंग म्हणतात.
मासिक पाळी शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे येते.
पुरूषांच्या मासिक पाळीला वैद्यकीय भाषेत इरिटेबल मेल सिंड्रोम असे म्हणतात. ज्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वेळोवेळी कमी जास्त होत असते.
यामुळे पुरुषांमध्ये डिप्रेशन, थकवा, चिंता आणि चिडचिडेपणा अशी लक्षणे दिसून येतात.
एका सर्वेक्षणानुसार, ही लक्षणे प्रत्येक ४ पैकी १ पुरुषामध्ये ही लक्षणे दिसून येतात. काही वाईट सवयी, मानसिक ताण आणि अनहेल्दी लाइफस्टाइल ही देखील याची कारणे असू शकतात.
यासाठी लाइफस्टाइल आणि आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर लक्षणे गंभीर असतील डॉक्टरांचा सल्ला घ्या.